मुंबई / अजेयकुमार जाधव
महाराष्ट्रामध्ये १५ वर्षे आणि त्याहून मोठ्या व्यक्तींमध्ये तंबाखूचा वापर इतर राज्यांच्या तुलनेत २८ टक्के आहे. राज्यातील मुलांनी आणि प्रौढ व्यक्तींनी तंबाखूचा वापर टाळावा याकरिता सरकारने विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत हेलिस सेख्सारीया इंस्टीट्यूट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. प्रकाश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
महाराष्ट्रामध्ये २००८ मध्ये स्मोक फ्री
कायद्याच्या अंमलबजावणी नंतर तीन वर्षांनी केवळ ३५ टक्के लोकांमध्येच
जागरूकता झाली आहे. यामुळे स्मोक फ्री कायद्यांची जागरूकता अधिक प्रमाणात
पसरण्याची गरज आहे असे डॉ. मंगेश पेडणेकर यांनी सांगितले. तंबाखू नियंत्रण
कायदे आणि त्याची परिणामकारक अंमलबजावणी
याला महाराष्ट्रामधील लोकांनी पाठींबा असून महाराष्ट्रा मधील ८० टक्के
लोकांनी तंबाखू वापराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.महाराष्ट्रामध्ये १५ वर्षे आणि त्याहून मोठ्या व्यक्तींमध्ये तंबाखूचा वापर इतर राज्यांच्या तुलनेत २८ टक्के आहे. राज्यातील मुलांनी आणि प्रौढ व्यक्तींनी तंबाखूचा वापर टाळावा याकरिता सरकारने विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत हेलिस सेख्सारीया इंस्टीट्यूट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. प्रकाश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.


No comments:
Post a Comment