घोडागाडी धारकांवर अन्याय होऊ नये म्हणून पोलीस आयुक्तांना पत्र देणार - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 November 2013

घोडागाडी धारकांवर अन्याय होऊ नये म्हणून पोलीस आयुक्तांना पत्र देणार - महापौर


Displaying DSC_2990.JPG

प्राण्यांचे हित जपण्यासाठी माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आदर सर्वांनीच केला पाहिजे. त्यास घोडागाडी धारक अपवाद होऊ शकत नाहीत. तथापि, न्यायालयाचे आदेश आणि कायदे व नियम यांच्या पलीकडे जाऊन घोडागाडी धारकांवर अन्याय होत असल्यास त्याबाबत योग्य कार्यवाही करण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच महापालिका आयुक्त यांनादेखील पत्र पाठविण्यात येईल, असे आश्वासन मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी ‘मुंबई घोडागाडी बचाव आंदोलन संलग्न युवा क्रांती सभा’ च्या शिष्टमंडळास दिले.

मुंबई शहरातील घोडागाडी वाहन चालकांवर प्राणी रक्षणासाठी कार्यरत असलेली ख्यातनाम संस्था पेटा तसेच पोलीस आणि महापालिका व संबंधित यांच्याकडून अन्याय होत असल्याचे लेखी निवेदन ‘मुंबई घोडागाडी बचाव आंदोलन संलग्न युवा क्रांती सभा’ या संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांना महापौर दालनात आज (दिनांक १९ नोव्हेंबर, २०१३) सायंकाळी दिले, त्याप्रसंगी महापौर प्रभु हे बोलत होते.

याप्रसंगी शिष्टमंडळाशी चर्चा करताना महापौर म्हणाले की, नियम हे सर्वांसाठी सारखे असतात. घोडागाडी चालक व मालकांनाही प्राण्यांची काळजी घेतलीच पाहिजे. तथापि, घोडागाडी चालक व मालक यांना अकारण कोणी त्रास देत असेल तसेच त्याचा परिणाम रोजगारावर होणार असेल तर, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी, यासाठी मुंबईचा प्रथम नागरिक या नात्याने पत्र लिहिणार असल्याचे महापौर प्रभु यांनी नमूद केले.

शिष्टमंडळाच्या वतीने संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक विशाल हिवाळे यांनी सांगितले की, अनेकदा प्रकृतीने उत्तम असलेले घोडेदेखील अकारण कायद्याचा धाक दाखवून पोलीस व पेटा सारख्या प्राणिमित्र संघटनांकडून नेले जातात. घोडागाडी धारकांविरुद्ध अंबिका हिरानंदानी यांनी केलेल्या सर्व तक्रारींची चौकशी व्हावी, अकारण जप्त करण्यात आलेले सर्व घोडे संबंधित मालकांना परत मिळावेत आणि त्यांचा रोजगार वाचवावा, रद्द केलेले घोडागाडी परवाने योग्य तो दंड आकारुन नूतनीकरण करण्यास संबंधित अधिकाऱयांना आदेश द्यावेत, मुंबईतील सुमारे १५० वर्षांची घोडागाडी / बग्गी / व्हिक्टोरिया वाहन चालविण्याची परंपरा अबाधित राखावी, अशी विनंती शिष्टमंडळाच्या वतीने हिवाळे, ग्रेगरी डिसोझा, वॉल्टर डिसोझा, किरीट ठक्कर, इंदू पलानी आदींनी यावेळी महापौरांकडे केली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS