ड्राईव्ह अगेन्स्ट डायबिटीस या मोहिमेचे आयोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2013

ड्राईव्ह अगेन्स्ट डायबिटीस या मोहिमेचे आयोजन



मुंबई : धावपळीचे जीवन, शारीरिक व मानसिक ताणतणाव यामुळे आहारावर परिणाम होऊन मधुमेहग्रस्त रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने ड्राईव्ह अगेन्स्ट डायबिटीस या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत बुधवारी मुंबईत सुमारे ५00 ठिकाणी नागरिकांची मधुमेह तपासणी केली जाणार आहे. जवळपास २ लाखांहून अधिक नागरिकांची या मोहिमेत तपासणी करण्याचे उद्दिष्ट असून सार्वजनिक, खाजगी उपक्रमातून भारतात प्रथमच असा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमातून मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशात मधुमेह या रोगाविषयी जनजागृती करण्याचे मुख्य लक्ष्य आहे. 

मधुमेह तपासणी मोहिमेत सुमारे २ लाख नागरिकांचे उद्दिष्ट्य साध्य झाले, तर त्यातून साधारणत: १0 ते १२ हजार संभाव्य रुग्ण समोर येतील, असा अंदाज आहे. पुढील वर्षी ५ लाख नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. तथापि, तपासणीची संख्या वाढली तरी संभाव्य रुग्णांची संख्या कमी होणे आवश्यक आहे. तेव्हाच या उपक्रमाचे आणि मधुमेह लढय़ाचे उद्दिष्ट साध्य झाले, असे म्हणता येईल, असे महापौरांनी नमूद केले. मनपा मुंबईकरांच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मधुमेह विरोधातील उपाययोजना यशस्वी करण्यासाठी डॉक्टर्स, सहकारी वैद्यकीय मंडळी प्रयत्न करत आहेत. खाजगी रुग्णालये आणि सामाजिक संस्थांनी त्यास हातभार लावावा, असे आवाहन महापौरांनी केले. नियोजित मधुमेह तपासणी मोहिमेप्रसंगी महापालिकेच्या ५५ डायबिटीक क्लिनिकपैकी काही ठिकाणी महापौर सुनील प्रभू हे स्वत: भेट देऊन पाहणी करणार आहेत. 

महापालिकेच्या ५५ डायबिटीक क्लिनिक आणि २0 रुग्णालयांतून मधुमेही रुग्णांना जीवनभर विनामूल्य उपचार पुरवले जातात. महापालिकेकडे सुमारे ८२ हजार मधुमेही रुग्णांचा तपशील तयार आहे. संसर्गजन्य आजारांपेक्षाही मधुमेहासारखे असंसर्गजन्य आजार वेगाने फैलावत असून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी अभिनव अशा उपक्रमासाठी मुंबईची निवड करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.या कार्यक्रमास अबॉट डायबिटीस केअर, जॉन्सन अँण्ड जॉन्सन मेडिकल इंडिया, अपोलो म्युनिक, सनोफी इंडिया यांचेही सहकार्य मिळाले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS