पालिका कर्मचार्‍यांना प्रशासन ट्रान्झिट कॅम्प बांधून देणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2013

पालिका कर्मचार्‍यांना प्रशासन ट्रान्झिट कॅम्प बांधून देणार

मुंबई : डॉकयार्ड रोड दुर्घटनेनंतर चेंबूर येथील पी. एन. लोखंडे मार्ग येथील मुंबई महापालिका वसाहतीत राहणार्‍या कर्मचार्‍यांना खोल्या खाली करण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. दिवाळीतच या नोटिसा पाठवण्यात आल्यामुळे पालिका कर्मचार्‍यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या धोकादायक इमारतीची पाहणी करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्यासह अतिरिक्त पालिका आयुक्त मोहन अडताणी यांनी पुढाकार घेतला. त्या वेळी धोकादायक इमारतीतील 'त्या' पालिका कर्मचार्‍यांना येत्या १५ दिवसांत ट्रान्झिट कॅम्प बांधून देण्यात येतील, असे आश्‍वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

चेंबूर येथील पी. एन. लोखंडे मार्ग येथे पालिका वसाहत असून या ठिकाणी चतुर्थश्रेणी कामगार राहतात. या वसाहतीतील १ ते १६ क्रमांकाच्या बिल्डिंगमध्ये सुमारे २00 कुटुंबे वास्तव्य करतात. या बिल्डिंगमधील 'ए' , 'बी' आणि ३ क्रमांकाच्या बिल्डिंग धोकादायक स्थितीत आहेत. त्यासाठी या धोकादायक इमारतीची पाहणी करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्यासह अतिरिक्त पालिका आयुक्त मोहन अडताणी यांनी पुढाकार घेऊन संबंधित बिल्डिंगची पाहणी केली. त्या वेळी धोकादायक इमारतीतील 'त्या' पालिका कर्मचार्‍यांना तत्काळ ट्रान्झिट कॅम्प बांधून देण्यात येतील, असे आश्‍वासन स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी उपस्थित पालिका कर्मचार्‍यांना दिले. या तिन्ही धोकादायक इमारतीतील पालिका कर्मचार्‍यांसाठी त्या ठिकाणी सर्वसुविधायुक्त अशी इमारत बांधून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या ठिकाणी ८ वर्षांपूर्वी खाली करण्यात आलेल्या ३ क्रमांकाच्या इमारतीच्या पुनर्बांधणीचे कामही त्वरित सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS