एमटीएचएल प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा हवा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2013

एमटीएचएल प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा हवा

मुंबई : दक्षिण मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अवघ्या काही मिनिटांच्या अवधीत बंदिस्त करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात शिवडी न्हावा शेवा प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा मिळण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मांडणार आहेत. 

प्रकल्पाचा वाढलेला खर्च, पर्यावरण खात्याच्या विविध परवानग्या, भूसंपादनाच्या अडचणी यामुळे प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी जापनिज बँकेकडून अर्थसहाय्य मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आणि विविध अडचणींवर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. हा दर्जा मिळाल्यास विविध परवानग्या लवकर मिळतील आणि प्रकल्प वेळेत मार्गी लागेल, या उद्देशाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधानांकडे राष्ट्रीय दर्जा मिळण्याची मागणी करणार आहेत. १0 हजार कोटींच्या आसपास खर्च असणार्‍या २२ किमीच्या या सागरी सेतूवर शिवडीहून पूर्व मुक्त मार्गाला जोडणारा आणि शिर्लेहून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा असा हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाची उभारणी इंजिनीयरिंग आणि प्रॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन पद्धतीने होणार आहे. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत कोणत्याही कंपनीने उत्सुकता न दर्शवल्याने पुन्हा सर्व प्रक्रिया एमएमआरडीएकडून राबविण्यात येणार आहे. तसेच पूर्वीच्या सहकारी खाजगी भागीदारी तत्त्वप्रणालीच्या वेळेस केंद्राकडून मिळणार्‍या तफावत निधीमध्ये आता वाढ झाली असण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS