मुंबई : नोव्हेंबरचे १0 दिवस उलटूनही कोसोदूर अंतरावर राहिलेली गुलाबी थंडी अखेर बुधवारी शहरात दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. दरवर्षी दिवाळीतच मुंबईकरांना थंडी 'हुडहुडी' भरवते. यंदा मात्र थंडीने मुंबईत दाखल होण्यास काही दिवसांचा विलंब केला. शहर व उपनगरात बुधवारी किमान तापमान सरासरीपेक्षा २ अंशांनी कमी म्हणजेच १९.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेल्याने हवामान खात्याने थंडीची 'एण्ट्री' जाहीर केली.
उत्तर भारतातील थंड वारे मुंबई व उर्वरित महाराष्ट्राच्या दिशेने प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे आता थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे कुलाबा वेधशाळेतील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. बुधवारी मुंबईत किमान १९.८ तर कमाल ३0.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. तसेच उर्वरित महाराष्ट्रात पुणे-१२.१, सोलापूर-१५.२, नागपूर-१३.६, नाशिक-१३.८, औरंगाबाद-१८.४, अकोला-१७.४, परभणी-१३.६ अंश असे किमान तापमान नोंदवले गेले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचा जोर वाढेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे

No comments:
Post a Comment