डॉ. आंबेडकरांच्या गाण्याची विटंबना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 November 2013

डॉ. आंबेडकरांच्या गाण्याची विटंबना

भिवंडी : प्रसिद्ध लोकगीत गायक आनंद शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गायलेल्या गीताचे विटंबन करून अज्ञात इसमाने त्या गीताचा आशय न बदलता व्हिडीओ क्लिप तयार करून त्यावर अश्लील पाश्‍चात्त्य नृत्याची व्हिडीओ क्लिप व्हॉट्सअँप या सोशल नेटवर्किंग साइटवर शंकर शांताराम शिंदे यांच्या मोबाइलवर पाठवून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केल्याचे उघडकीस आल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोनि. संजय सातव करीत आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS