राष्ट्रवादीच्या विजय कांबळेंच्या इंदू मिल आंदोलनाचा फज्जा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2013

राष्ट्रवादीच्या विजय कांबळेंच्या इंदू मिल आंदोलनाचा फज्जा


Displaying DSC_0178.JPG

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलचा ताबा घेऊन तेथे भूमिपूजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व सामाजिक समता मंचचे अध्यक्ष विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी इंदू मिलसमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी काही कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी इंदू मिलच्या आत जाण्यास मज्जाव केल्याने आंदोलनकर्त्याना मागे फिरावे लागल्याने तसेच कांबळे यांनाही इंदू मिलच्या बाहेर बुद्ध वंदना घेवून मागे फिरावे लागल्याने आंदोलनाचा फज्जा उडाला आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी २२ नोव्हेंबरला १० हजार कार्यकर्ते रत्यावर उतरतील आणि इंदू मिलच्या आत घुसून इंदू मिलचा ताबा घेऊ असा इशारा विजय कांबळे यांनी दिला होता. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी इंदू मिलसमोर फक्त ५०० ते ६०० कार्यकते जमा झाले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत इंदू मिलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. यादरम्यान काही संतप्त कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. पाठींबा देवूनही या आंदोलनाकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवली. पोलिसांनी रस्त्यावर गाड्या आडव्या लावून आंदोलकांना इंदू मिलच्या गेट पर्यंत पोहोचूच  नसल्याने आंदोलनकर्त्यांना नाईलाजाने इंदू मिलचा ताबा न घेताच माघारी फिरावे लागले. कांबळे यांच्या सोबत पाच कार्यकर्त्यांना इंदू मिलच्या दारावर बुद्ध वंदना घेण्याची परवानगी देण्यात आली बुद्ध वंदना घेवून कांबळे परत आंदोलकांकडे आले असता आंदोलकांनी इंदू मिलचा ताबा घेतलाच अशी होऊन जल्लोष करण्यात आला. 

इंदू मिल साठी याआधी आंदोलन करणारे आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले यांना इंदू मिलच्या आत सोडण्यात आले होते परंतु शुक्रवारच्या आंदोलनावेळी कांबळे यांना त्यांच्या पक्षाचे सरकार सत्तेमध्ये असतानाही मिलच्या गेटवरून हात हलवत परत फिरावे लागल्याने आंदोलनाचा फज्जा उडाल्याचे बोलले जात आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS