मुंबई : पर्यटकांच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू असलेल्या घोडागाड्या बंद करण्याची मागणी अभिनेत्री ज्ॉकलिन फर्नांडिसने केली आहे. पोटापाण्यासाठी व्यवसाय करणारे घोडागाडी चालक अश्वांवर अत्याचार करत आहेत. यामुळे अश्वांना क्रूरपणे वागणूक देणार्या घोडागाडी चालकांवर कारवाई करावी, असे ज्ॉकलिनने म्हटले आहे.
गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव, जुहू, गोराई आणि इतर पर्यटनाच्या स्थळी घोडागाड्यांवर सैर करण्यास पर्यटकांची नेहमीच पसंती असते. मात्र यासाठी घोडागाडी चालक अश्वांची योग्य ती काळजी घेत नाहीत. आजारी अश्वांनाच गाडीला जुंपण्यात येते. योग्य तो आहार दिला जात नाही. मात्र देण्यात येणार्या आहाराचा दर्जा योग्य नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या घोडागाडी चालकांवर कारवाई करण्याची मागणी ज्ॉकलिनने केली आहे. महापालिका मुख्यालयात ज्ॉकलिन आल्याचे कळताच प्रसारमाध्यमांमध्ये गर्दी उसळली. महापौर सुनील प्रभू यांच्याकडे ज्ॉकलिनने अश्वांवर होणार्या अत्याचाराबाबतची छायचित्रे दाखविली. ज्ॉकलिनच्या मागणीबाबत आयुक्त निर्णय घेतली, अशी प्रतिक्रिया महापौरांनी दिली आहे.

आमच्यावरच अन्याय होत आहे
घोडागाडी बचाव आंदोलन संलग्न युवा क्रांती सभेने आपल्यावरच संबंधित यंत्रणेकडून अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. पोलीस, महापालिकेकडून घोडागाडी चालकांना नाहक त्रास होत असल्याचे सभेच्या शिष्टमंडळाने महापौरांना सांगितले. घोडागाडी चालकांवर अन्याय होऊ नये यासाठी योग्य ते पाऊल उचलण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी शिष्टमंडळास दिले

No comments:
Post a Comment