टॅक्सीचा १ डिसेंबरपासून संप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2013

टॅक्सीचा १ डिसेंबरपासून संप

मुंबई : मुंबई शहरातील काळय़ा-पिवळय़ा टॅक्सीचे बाद झालेले परवाने फ्लिट टॅक्सींना देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा युनियनने येत्या १ डिसेंबरपासून संपाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वीच काळय़ा-पिवळय़ा टॅक्सीचे रद्द झालेल्या परवान्यांपेकी ७५00 टॅक्सींचे परवाने फ्लिट टॅक्सी सेवेला निविदा पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात मुंबईत संप पुकारण्यात येणार आहे. मुंबई शहरात सुमारे ३५ हजार काळय़ा-पिवळय़ा टॅक्सी चालतात. त्यामुळे रद्द झालेले ७ हजार ८४४ परवाने फ्लिट टॅक्सीऐवजी काळय़ा-पिवळय़ा टॅक्सी धारकांना प्राधान्याने द्यायला हवेत, अशी भूमिका स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा युनियनने घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष के. के. तिवारी यांनी सांगितले. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात येत्या १ डिसेंबरपासून संप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या संपात विमानतळापासून इतरत्र धावणार्‍या सर्व टॅक्सी सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. टॅक्सी चालकांवर होणार्‍या अन्यायाविरोधात हा संप पुकारण्यात आल्याने रिक्षाचालकांचा या संपात नैतिक पाठिंबा असल्याचेही तिवारी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS