पुनर्वसनासाठी शिवाजी पार्क येथील इमारती श्रेणी '२-ब'मध्ये घेण्याची सूचना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 November 2013

पुनर्वसनासाठी शिवाजी पार्क येथील इमारती श्रेणी '२-ब'मध्ये घेण्याची सूचना

मुंबई : शिवाजी पार्क परिसरातील इमारतींचे पुनर्वसन करण्यासाठी 'त्या' श्रेणी एक ऐवजी श्रेणी २-ब मध्ये घेण्यात याव्यात तसेच यासंदर्भात रहिवाशांकडून आलेल्या सूचनांचा आणि मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून राज्य शासनाला आणि उच्च न्यायालयाला आपण अहवाल सादर करावा, अशी सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली.

मुंबईतील ऐतिहासिक व पुरातन वारसा वास्तूंची व परिसरांची एक यादी तयार करण्यात आली असून, अशा वास्तूंची एक, दोन व तीन अशा तीन श्रेणीत वर्गवारी करण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या वास्तूला श्रेणी 'एक' देण्यात आले असून, अशा वास्तूमध्ये अंतर्गत व बाह्य स्वरूपातील कोणताही बदल करण्यास मनाई आहे, मात्र श्रेणी 'दोन-ब' मधील वास्तूमधील अंतर्गत बदलांना परवानगी आहे. तथापि बाह्य स्वरूप कायम ठेवण्याविषयी निर्बंध आहेत, आणि श्रेणी ३ मधील वारसा वास्तूबाबत मात्र दुरुस्ती आणि बदल करण्यास तुलनात्मक दृष्टीने मुभा देण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानाच्या आजूबाजूला असणार्‍या सर्व इमारती श्रेणी 'एक'मध्ये अंतभरूत करण्यात आल्याने त्यांचे पुनर्वसन करणे कठीण आहे. तेथील अनेक इमारती नादुरुस्थावस्थेत असून कोणत्याही क्षणी या इमारतींना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या इमारतींचे त्वरित पुनर्वसन करणे जरुरी आहे. या परिसरातील इमारती हेरिटेज श्रेणी 'एक'मध्ये ठेवल्यास त्याचा विकास होणे कठीण होईल, त्यामुळे या सर्व इमारती श्रेणी '२-ब' मध्ये घेण्यात याव्यात, अशी सूचना शेवाळे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS