मुंबई : बेस्ट उपक्रमाकडून १ नोव्हेंबरपासून होणार्या त्रैमासिक कालावधीकरिता १२ बस आगारांमध्ये संगणकीकृत कार्य अनुसूचीची अंमलबजावणी सुरू करण्यास बेस्ट समिती सभेत मान्यता देण्यात आली. प्रस्तूत १२ बस आगारांपैकी १ जुलै २0१३ पासून सुरू होणार्या त्रैमासिक कालावधीकरिता दोन बस आगारांमध्ये स्वयंचलित अनुसूचीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे नोव्हेंबरपासून सुरू होणार्या त्रैमासिक कालावधीकरिता दहा बस आगारांमध्येच स्वयंचलित अनुसूची सुरू करण्यात येणार आहे. १२ बस आगारांमध्ये स्वयंचलनाचे काम सुरू करण्यापूर्वी बस प्रवर्तनाची अनुसूची तयार करायची आहे. अशी काही विशिष्ट ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाच्या बचतीची परिगणना करताना आगारामधील बस व सेवकवर्गाच्या गुणोत्तराचा आधार विचारात घेतला असता १ नोव्हेंबरपासून १२ आगारांमध्ये उपक्रमाकडून ४.३३ टकके एवढी बचत प्राप्त करण्यात आल्याचे समिती सभेत महाव्यवस्थापक गुप्ता यांनी सांगितले.
Post Top Ad
14 November 2013
Home
Unlabelled
दहा बस आगारांमध्ये स्वयंचलित यादी
दहा बस आगारांमध्ये स्वयंचलित यादी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment