महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीचे लोक असुरक्षित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 November 2013

महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीचे लोक असुरक्षित

महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीचे लोक असुरक्षित
एट्रोसिटी गुन्ह्यामध्ये प्रचंड वाढ / न्यायालयात ५९०७ प्रकरणे प्रलंबित
दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी 
मुंबई / अजेयकुमार जाधव / http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website )
फुले, शाहू, आंबेडकर, यांचे नाव घेऊन राज्य करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहेत. मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत असताना न्यायालयामध्ये दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये दोषींवर खुप कमी प्रमाणात आरोप सिध्द होऊन शिक्षा झाल्याचे महाराष्ट्र राज्य पोलिस मुख्यालयाने माहिती अधिकारात दिलेल्या माहिती मधून समोर आले आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीचे लोक सुरक्षित नाही हे सिध्द झाले आहे. 

वसई येथे राहणारे चंद्रमणी जाधव यांनी अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा - १९८९ अन्वये किती गुन्हे दाखल झाले, किती केसेस न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत याची माहिती राज्य पोलिस मुख्यालयाकडून मागवली होती. याबाबत माहिती देताना ६८९ गुन्ह्यांचा तपास सुरु आहे, न्यायालयामध्ये फक्त २०१ प्रकरणात शिक्षा झाली असून ३६१६ प्रकरणात दोषींना निर्दोष सोडले आहे. न्यायालयात ५९०७ प्रकरणे प्रलंबित असून ५१४७ दोषारोपपत्र दाखल केल्याचे कळवण्यात आले आहे. 

सन २००९ मध्ये खुनाच्या ३३, गंभीर दुखापतीच्या ४७, बलात्काराच्या १५६,जाळपोळीच्या १५, दंगलीच्या २०९, विनयभंगाच्या १४६, पळवून नेण्याच्या १७, जबरी चोरीच्या १० दरोडाच्या २३ इतर ५६४ तर एट्रोसिटीच्या ५२ अशा एकूण १२७२ केसेस दाखल झाल्या आहेत. सन २०१० मध्ये खुनाच्या ३५ गंभीर दुखापतीच्या ४,४ बलात्काराच्या १४०, जाळपोळीच्या १७, दंगलीच्या २३०, विनयभंगाच्या १७६, पळवून नेण्याच्या ३२, जबरी चोरीच्या १२, दरोडाच्या २६, इतर ५४१ तर एट्रोसिटीच्या १५० अशा एकूण १४०३ केसेस दाखल झाल्या आहेत. 

सन २०११ मध्ये खुनाच्या ४८ गंभीर दुखापतीच्या १३०, बलात्काराच्या १५७, जाळपोळीच्या १३, दंगलीच्या २२६, विनयभंगाच्या १८९, पळवून नेण्याच्या २०, जबरी चोरीच्या ११, दरोडाच्या १९, इतर ५६५ तर एट्रोसिटीच्या ७८ अशा एकूण १४५६ केसेस दाखल झाल्या आहेत. सन २०१२ मध्ये खुनाच्या ४८, गंभीर दुखापतीच्या ५३, बलात्काराच्या १५७, जाळपोळीच्या १६, दंगलीच्या २०३, विनयभंगाच्या १७४, पळवून नेण्याच्या ३०, जबरी चोरीच्या २०, दरोडाच्या २४, इतर ६२३ तर एट्रोसिटीच्या ५४ अशा एकूण १४०२ केसेस दाखल झाल्या आहेत. 

तर ३१ मे २०१३ पर्यंत पहिल्या पाच महिन्यामध्ये खुनाच्या १९, गंभीर दुखापतीच्या ४, बलात्काराच्या १२६, जाळपोळीच्या ८, दंगलीच्या १३७, विनयभंगाच्या १३३, पळवून नेण्याच्या २०, जबरी चोरीच्या १२, दरोडाच्या १३, इतर ३७१ तर एट्रोसिटीच्या ३७ अशा एकूण ९१७ केसेस दाखल झाल्या आहेत. सन २००९ ते सन २०१२ पर्यंतची आकडे वारी पाहिल्यास अनुसूचित जाती जमाती मधील लोकांवर अन्याय अत्याचार सतत वाढत असून सन २०१३ मध्ये सर्वच गुन्ह्यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS