http://jpnnews.webs.com
दादरमधील इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाचे 6 डिसेंबरपूर्वी भूमिपूजन करावे, अन्यथा मिलची जागा ताब्यात घेऊ, असा इशारा विविध संघटनांनी दिल्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाने आज (सोमवार) केंद्रीय महामंडळाच्या अखत्यारीतील ही जमीन राज्य सरकारच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे विधेयक येत्या अधिवेशनात मांडले जाणार आहे.
मुंबईत इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे राज्य सरकारने गेल्या वर्षी मान्य केले होते. मात्र केंद्र शासनाच्या अखत्यारीतील ही जमीन अद्याप राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे वर्षभरापासून स्मारकाचा विषय रेंगाळत पडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विजय कांबळे यांनी काही दिवसांपूर्वीच शेकडो कार्यकर्त्यांसह इंदू मिलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, आणि लवकरात लवकर भुमीपूजन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही पाच डिसेंबर पर्यंत भूमीपूजन झाले नाही तर, हजारो कार्यकर्त्यांसह इंदू मिलमध्ये प्रवेश करु असा इशारा दिला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने जमीन हस्तांतरणाला दिलेली मंजुरी महत्वाची मानली जात आहे.
त्वरित भूमिपूजन करा!
इंदू मिलची जागा आंबेडकरांच्या स्मारकासाठी राज्य सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्याने त्याचे आपण स्वागत करत आहोत. हस्तांतरणाची अडचण दूर झाल्याने आता स्मारकाचे त्वरित भूमिपूजन राज्य सरकारने करावे, असे सांगत येत्या ५ डिसेंबरपर्यंत भूमिपूजन झाले नाही तर ६ डिसेंबरला इंदू मिलमध्ये घुसून भूमिपूजनाचे आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी पुन्हा दिला.
प्रदेश काँग्रेसकडून स्वागत
इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रस्तावित स्मारक काँग्रेस पक्षासाठी कधीही केवळ श्रेयाचा मुद्दा नव्हता. या स्मारकाचे श्रेय ज्याला हवे त्यांनी घ्यावे, मात्र कोणत्याही परिस्थितीत बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याचे अभिवचन काँग्रेसने दिले होते आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय त्यादिशेने केलेली वचनपूर्तीच आहे. डॉ. आंबेडकर यांचे स्मारक देशासाठी, काँग्रेस पक्षासाठी अस्मितेचे प्रतीक असून प्रस्तावित स्मारकाला लवकरात लवकर मूर्तरूप देणे हीच आमची प्राथमिकता आहे, असे प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे

No comments:
Post a Comment