शौचालय, कचराकुंड्या, पिकदाण्या आदी सुविधा ठरावीक अंतरावर उपलब्ध करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 November 2013

शौचालय, कचराकुंड्या, पिकदाण्या आदी सुविधा ठरावीक अंतरावर उपलब्ध करा

मुंबई - 27 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबई मनपाच्या हद्दीमध्ये ठरावीक अंतरावर शौचालय, मुतार्‍या, कचराकुंड्या, पिकदाण्या आदींची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेविका राजश्री पालांडे यांनी ठराव्याच्या सूचनेद्वारे केली.

मुंबई महानगरपालिकेतर्फे रस्ते सुस्थितीत स्वच्छ व कचरामुक्त ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम, दत्तक वस्ती योजना, हैदराबाद पॅटर्न तसेच अनेक योजना राबविण्यात येतात. तसेच स्वच्छता मोहिमेतंर्गत रस्त्यावर थुंकणार्‍या, कचरा टाकणार्‍यावर क्लीनअप मार्शलद्वारे दंड आकारण्यात येतो. मात्र पालिकेच्या हद्दीमध्ये रस्त्यांवर कचराकुंडी, पिकदाण्या, मुतार्‍यांची सुविधा नसल्याने तासन्तास प्रवास करणार्‍या अस्थमा, मधुमेह या आजारांनी ग्रस्त रुग्णांकडून रस्त्यावर थुंकणे, उघड्यावर मूत्र विसर्जन करणे रस्त्यावर नाईलाजाने घडते. त्यांच्याकडून क्लीनअप मार्शल दंड वसूल करतात. त्यामुळे मनपाच्या हद्दीत ठरावीक अंतरावर शौचालय, कचराकुंड्या, पिकदाण्या आदींची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी पालांडे यांनी केली आहे. दरम्यान, पालिकेच्या पुढील सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होऊन या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS