मुंबई - 26 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : बेस्टमध्ये होऊ घातलेल्या भाडेवाढीला सत्ताधारी शिवसेना-भाजपाने परवानगी दिली आहे. त्यातच भाडेवाढीचे खापर आपल्यावर फुटू नये म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांनी भाडेवाढीला विरोध असल्याचे दाखवत सभात्याग करून भाडेवाढीचा मार्ग मोकळा करून दिला आहे. मंगळवारी बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता आपल्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर २0१४-१५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रासह भाडेवाढीला मंजुरी देणार आहेत. याला सत्ताधार्यांकडून पूर्णपणे पाठिंबा देण्यात आला आहे.

वाढणारी डिझेलची किंमत, टायर अणि ट्यूबचा खर्च, देखभाल-दुरुस्तीचा खर्च यामुळे बेस्टसमोर भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. भाडेवाढीवर सत्ताधारी शिवसेना-भाजपा युती ठाम असली तरी सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने मात्र सभात्याग केला. अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा न करता काँग्रेसने मात्र त्यातून माघार घेतली. बेस्टच्या भाडेवाढीला आपला विरोध असल्याचे दर्शवत काँग्रेसने आपली विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे. या वेळी मनसेने मात्र भाडेवाढीला आपला पाठिंबा देत भाडेवाढ करायची असेल तर प्रवाशांना तशा उच्च दर्जाच्या सुविधा पुरवण्याची मागणी केली. जास्त भाडे द्यायला मुंबईतील प्रवासी तयार आहेत, पण त्यांच्या दर्जानुसार एसी, नानॅएसी बससेवा देणे आवश्यक झाले आहे. विद्युत विभागाच्या जीवावर परिवहन विभाग किती दिवस जगणार असा प्रश्न या वेळी मनसेचे सदस्य संदीप देशपांडे यांनी केला. बेस्ट समितीमध्ये भाडेवाढीला काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादी पक्षाने एकत्र येऊन विरोध केला असता तर मुंबईकरांना बेस्टच्या भाडेवाढीतून दिलासा मिळाला असता.
सत्ताधारी शिवसेना-भाजपा भाडेवाढीवर ठाम असली तरी शिवसेनेच्या एका सदस्याने भाडेवाढ केल्यास प्रवासी शेअर रिक्षा-टॅक्सीकडे वळतील, अशी भीती व्यक्त करीत भाडेवाढ कमी करण्याची मागणी केली. सेनेचे रंजन चौधरी यांनी भाडेवाढीत कपात व्हायला हवी, अशी मागणी केली. बेस्टचे किमान भाडे ५ रुपये ठेवून त्यापुढील टप्प्याचे भाडे वाढविण्यात यावे, अशी मागणीही रंजन चौधरी यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment