मुंबई - 30 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांचा जीवावर चालणार्या ट्रेड युनियनने दुकाने थाटली असून मागासवर्गीय समाजातील काही विशिष्ट जातींना विकण्याचा धंदा युनियन कडून केला जात आहे. या युनियनचा बोनस सोडून कोणताही अजेंडा नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांचे कित्तेक प्रश्न अनुत्तरीत राहत असल्याने या युनियनचा सफाई कर्मचाऱ्यांनी राजीनामा द्यावा आवाहन सफाई कामगार परिवर्तन संघ व मुंबई महानगर पालिका सफाई कामगार हक्काचे घर संघर्ष समितीचे हरळकर अनिल कांबळे प्रशांत सावंत यांनी केले आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या एसआर मधून गेल्या २५ ते ३० वर्षात २०० ते ३०० कोटी रुअपये जमा करण्यात आले तरी कामगार वसाहतीमधील इमारती दुरुस्त करण्यात आलेल्या नाहीत. पालिकेचे २७ हजार कोटींचे बजेट असताना या बजेटच्या १० टक्के रक्कम सुद्धा सफाई कामगारांसाठी खर्च केली जात नाही. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची अवस्था दयनीय असताना कोणत्याही युनियनने आवाज उठवला नाही डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनेनंतर सर्वच युनियनवाले जागे झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
सध्या राहत असलेल्या इमारती खाली करण्याचे कारस्थान प्रशासनाने रचले असून माहूल येथे पाठवले जात आहे. या ठिकाणाहून सकाळी हजेरीवर वेळेवर पोहोचणे मुलांना शाळेत सोडणे अशक्य असल्याने आम्ही राहत असलेल्या ठिकाणीच संक्रमण शिबिराची घरे बांधून राहायला द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. गौतम नगर कोचीन स्ट्रीट वाल पाखाडी येथील इमारती पुनर्बांधणीसाठी पडून ६ ते ९ वर्षे झाली तरी अद्याप या इमारती बांधण्यात आलेल्या नाहीत. २००८ मध्ये आश्रय योजना व आंबेडकर आवास योजना शासनाने सुरु केली असली तरी या योजना पालिकेने राबवल्याच नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कामगारांच्या प्रश्नावर सर्वच युनियन गप्प बसल्या असल्याने कामाचार्यानी पुढाकार घेवून संघर्ष समितीची स्थापना केली आहे या समिती मार्फत सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रशासन व सत्ताधाऱ्या समोर मांडले जाणार असून महापौर व आयुक्त यांची लवकरच भेट घेवून निवेदन देणार असल्याचे हरळकर यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment