रिक्षांचे आंदोलन बारगळले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2013

रिक्षांचे आंदोलन बारगळले

8 सोमवारी ठरणार आंदोलनाची तारीख आणि दिशा
मुंबई - 28 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
भाडेवाढीच्या प्रश्नावरून आता रिक्षावालांच्या इतर मागण्यांवर लक्ष केंद्रित करून रिक्षांचा गुरुवारपासून (२८ नोव्हेंबर) होऊ घातलेला बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. सीएनजीसह इतर मागण्यांसाठी मुंबईसह राज्यातील सुमारे १५ लाख रिक्षांचे बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनने दिला होता. परंतु कृ ती समितीचा आंदोलनाविषयीचा निर्णय अजून झालेला नसल्याचे कारण सांगत पुन्हा एकदा शरद राव यांनी नांगी टाकली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे.

मुंबईसह राज्यभर रिक्षाचालकांना सीएनजी गॅस भरण्यासाठी पंपावर मोठय़ा रांगा लावाव्या लागतात. त्यात त्यांचे ३-४ तास जातात. सीएनजी गॅसचा पुरवठा सुरळीत होत नाही, तो पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. मुंबई शहरात खाजगी बसेस, ट्रॅव्हल्स, कॉलसेंटरच्या गाड्यांमधून मोठय़ा प्रमाणात प्रवासी वाहतूक केली जाते. रेल्वे स्टेशन ते घर अशी वाहतूक केली जात असल्यामुळे बेस्टच्या बसेस आणि रिक्षाचालकांना प्रवासी मिळत नाहीत. परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होते. याविषयी परिवहन आयुक्तांना ४ जुलै रोजी पत्र पाठविण्यात आले असून आजपर्यंत त्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई करण्यात आलेली नाही. त्याशिवाय राज्य सरकारने रिक्षाचालकांच्या कल्याणकारी मंडळासाठी जी समिती स्थापन केली आहे, ती बरखास्त करून त्याजागी नवी समिती स्थापन करावी, अशी मागणीही करण्यात आली होती. तसेच रिक्षाचालक एका वर्षाला सुमारे २८00 कोटी रुपये इन्शुरन्सचे भरतात, त्या रकमेचीच कल्याणकारी योजना राबविण्याची मागणीही केली होती. या सर्व मागण्यांची पूर्तता येत्या १५ दिवसांत राज्य शासनाने केली नाही तर येत्या २८ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती शशांक राव यांनी दिली होती. परंतु कृती समितीसमोर रिक्षाचालकांचे अनेक प्रश्न आले असून त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. कृती समितीला राज्यभर आंदोलन करायचे आहे, त्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोमवारपर्यंत आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिली. तसेच आमचे आंदोलन होणार, असा विश्‍वास व्यक्त करीत येत्या सोमवारी आंदोलन कधी होणार याचा निर्णय होणार असल्याचेही शशांक राव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS