मेट्रोच्या लोकार्पणासाठी १५ जानेवारीचा मुहूर्त ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2013

मेट्रोच्या लोकार्पणासाठी १५ जानेवारीचा मुहूर्त ?

मुंबई - 28 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्णत्वाला आले असून या रखडलेल्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यासाठी १५ किंवा २६ जानेवारीचा मुहूर्त काढल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. डिसेंबर २0१३पर्यंत या मार्गिकेचे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सुविधेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या मोनोरेलची पहिली ट्रायल रन २६ जानेवारी रोजी तर मेट्रोच्या अधिकृत चाचणीसाठी १ मे, महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त शोधण्यात आला होता. त्यामुळे मेट्रोच्या लोकार्पणासाठीदेखील १५ जानेवारी किंवा २६ जानेवारीचा दिवस ठरवण्यात येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच मेट्रोच्या लोकार्पणासाठी आवश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्याचबरोबर वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो रेल मार्गिकेसाठी इंडियन ट्राम वे अँक्ट १८८६ लागू करण्यात आल्याने मेट्रोच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वीपणे घेण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच मेट्रोच्या गाड्याही मुंबईत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मेट्रोच्या लोकार्पणाची तयारीही जोरदार असल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS