जर्नालीस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राची मागणी
मुंबई - 27 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई महानगर पालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना २०११ मध्ये प्रस्ताव मंजूर करूनही अद्याप बेस्ट बस गाड्यांचे सवलतीच्या दरातील बसपास मिळाले नसताना मंत्रालयातील पत्रकारांना बसपास देण्याचा प्रस्ताव पालिकेमध्ये २९ नोव्हेंबरला मंजूर होणार आहे. पालिकेतील पत्रकारांवर हा अन्याय असल्याने मंत्रालयातील पत्रकारांना बसपास देण्याआधी पालिकेतील पत्रकारांना बसपास मिळावेत अशी मागणी जर्नालीस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे मुंबई अध्यक्ष अजेयकुमार जाधव यांनी केली आहे.
बेस्ट समिती व मुंबई महानगर पालिकेने सभा, बैठका, कार्यक्रम यांचे वृत्त संकलन करताना पत्रकारांसाठी गाड्यांची सोय करावी लागते त्यावर होणारा खर्च कमी करण्यासठी बेस्ट बसचे पास देण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या दोन वर्षात निर्णय घेवूनही फक्त बेस्टचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांनाच बसपास देण्यात आले. पालिकेच्या एकाही पत्रकाराला बसपास देण्यात आलेला नाही.
पालिकेतील पत्रकारांनाच बसपास मिळाले नसताना बेस्ट समितीने मंत्रालयातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बस पास देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई महानगर पालिकेतील पत्रकारांवर अन्याय होणार असल्याने मंत्रालयातील पत्रकारांना बसपास देण्याचा प्रस्ताव पालिका सभागृहामध्ये मंजूर करण्यापूर्वी २०११ च्या पालिकेतील पत्रकारांना बसपास देण्याची अंमलबजावणी करावी व पालिकेतील पत्रकारांना आधी बसपास वितरीत करावेत अशी मागणी जर्नालीस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे मुंबई अध्यक्ष अजेयकुमार जाधव यांनी मुंबईचे महापौर सुनील प्रभू, आयुक्त सीताराम कुंटे, विरोधी पक्ष नेते तसेच सर्व गटनेत्यांना निवेदन देवून केली आहे.


No comments:
Post a Comment