येत्या ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या दिवसापर्यंत इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उभारणीस सुरुवात न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी दिला आहे. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येणार्या लाखो भाविकांच्या साक्षीने आंदोलन सुरू झाल्यास निवडणुकीच्या दृष्टीने ते योग्य ठरणार नाही. गेल्या ६ डिसेंबरला इंदू मिलची जागा या स्मारकाला देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. मात्र आजपर्यंत या स्मारकाचा आराखडाही तयार झाला नाही. पर्यावरण तसेच इतर वेगवेगळ्या खात्याच्या परवानग्याही अजून मिळालेल्या नाहीत. केंद्र सरकारकडून होत असलेला हा विलंबही सरकारच्या दृष्टीने चांगला राहणार नाही. त्यामुळे या विषयावर हे दोन्ही नेते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री चव्हाण मंगळवारी नागपूरजवळ सावनेर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून ते मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले. तेथूनच ते राजधानी दिल्लीला रवाना झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईतच होते. मंत्रालयात न येता त्यांनी आपल्या निवासस्थानीच बहुतांशी कामकाज केले. त्यानंतर तेथूनच ते दिल्लीला रवाना झाले, असे कळते.
Post Top Ad
13 November 2013
Home
Unlabelled
डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीत
डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीत
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment