बेस्टमध्ये आता महिलांना प्राधान्य - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 November 2013

बेस्टमध्ये आता महिलांना प्राधान्य

मुंबई : सध्या बेस्ट उपक्रमातर्फे मुंबईतील रेल्वे स्थानके, नागरी वसाहत, वाणिज्य संकुले येथून काही बसमार्गावर सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेस महिला प्रवाशांच्या सोयीकरिता महिला विशेष बसफेर्‍या चालविण्यात येतात. तसेच काही मार्गावर महिलांना बसमध्ये प्रवेश करण्याकरिता प्रथम प्राधान्य दिले जाते.

सध्या कामावर जाणार्‍या महिलांची वाढती संख्या लक्षात घेता बेस्ट प्रशासनातर्फे वांद्रे रेल्वे टर्मिनस आणि कुर्ला स्थानक (प.) दरम्यान चालविण्यात येणार्‍या बसमार्ग क्रमांक ३१0 वर बुधवारपासून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस महिला विशेष तसेच महिलांना प्रथम प्राधान्य बसफेर्‍या चालविण्यात येणार आहेत.महिलांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी महिला विशेष बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. सकाळच्या वेळेत ८ वाजून २५ मिनिटे आणि १0 वाजून ५७ मिनिटांनी चालविण्यात येणार्‍या बसेसमध्ये महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून सकाळी १0 वाजून ५ मिनिटांनी चालविण्यात येणारी बस महिला विशेष असणार आहे. तसेच संध्याकाळच्या वेळेत ५ वाजून १५ मिनिटे आणि ६ वाजून १५ मिनिटांनी चालविण्यात येणार्‍या बसेसमध्ये महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून संध्याकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी आणि ६ वाजून १५ मिनिटांनी चालविण्यात येणारी बस महिला विशेष असणार आहे. या बसेस आयसीआयसीआय बँक आणि एमएमआरडीए-कुटुंब न्यायालय या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS