| मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपा-रिपाइंच्या महायुतीचा विजय निश्चित आहे. शिवशक्ती-भीमशक्तीच्या अभेद्य एकजुटीचा भगवा आणि निळा झेंडा विधानसभेवर फडकवण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न महायुती साकार करेल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना शिवाजी पार्क येथे व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महायुती मजबूत असून भाजपाच्या खंबीर साथीने लोकसभा आणि विधानसभेचा गड महायुतीला सहज सर करता येणार आहे. राज्यात कल्याणकारी राज्य आणण्यासाठी शिवशक्ती-भीमशक्तीच्या हाती सत्ता सोपवण्याचे शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या आवाहनाला महाराष्ट्राची जनता आगामी निवडणुकीत उदंड प्रतिसाद देईल व महायुतीचा विजय होईल, असे आठवले म्हणले. |
Post Top Ad
18 November 2013
Home
Unlabelled
शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न महायुती साकारेल
शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न महायुती साकारेल
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment