गोरेगाव ते दहिसर पाणी कपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 November 2013

गोरेगाव ते दहिसर पाणी कपात

मुंबई - 27 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : मालाड येथे तडे गेलेल्या जलबोगद्याच्या दुरुस्तीचे काम जल विभागाने हाती घेतले आहे. २८ नोव्हेंबर रोजी रात्री एक वाजता काम सुरू होणार असून, ते ११ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या १४ दिवसांच्या कालावधीत गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर या टप्प्यात ३0 टक्के पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. या काळात काही ठिकाणी पाणीपुरवठा करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पुरेपूर साठा करून पाणी जपून वापरण्याचे आवाहन मनपाने केले आहे

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS