मुंबई - 27 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबई मनपातील सफाई खात्यातील कर्मचार्यांच्या वारसांना वारसा हक्क पद्धतीने नोकरी व २५ वर्षे सेवा केलेल्या आजी व माजी कामगारांना मोफत घरे द्यावीत, यासह अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई म्युनिसिपल कामगार संघातर्फे मंगळवारी आझाद मैदानात तीव्र निदर्शने करण्यात आली.
लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करताना पालिकेने अंत्यत संकुचित भूमिका घेतली व स्वायत्ततेच्या सबबीखाली प्रत्यक्ष कामाचे सर्वेक्षण न करता निरनिराळय़ा खात्यातील काही थोडक्याच पदानांच या शिफारशीतील तरतुदी लागू केल्या. मनपाने प्रत्यक्ष घाण हाताळणार्या खात्यातील काही मोजकीच पदे लाड-पागे शिफारशीच्या तरतुदींखाली आणली व परिपत्रक काढून खातेनिहाय वारस हक्क लाभार्थी पदांची यादी जाहीर केली. त्यामुळे याबाबत सर्वेक्षणची केलेली मागणी प्रशासनाने मान्य केली, मात्र अद्याप याचे सर्वेक्षण झाले नाही, असा आरोप अँड़ प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबई म्युनिसिपल कामगार संघाने केला आहे. या कामगारांच्या वारसांना वारसा हक्क नोकरी द्यावी, कामगारांना मोफत घरे द्यावीत, कामगार वस्त्यांतील घरे कामगारांच्या मालकीची करा, स्ट्रक्चरल ऑडिटशिवाय इमारती खाली करू नये, आदी या संघटनेच्या मागण्या असून, या मागणींचे निवेदन संघटनेचे सरचिटणीस सुभाष पवार, यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंगळवारी आयुक्तांना सादर केले.

No comments:
Post a Comment