रेल्वेचा पास आता मोबाइलवरही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 November 2013

रेल्वेचा पास आता मोबाइलवरही

मुंबई - 27 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
उपनगरीय रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना रेल्वेचा पास काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी आता प्रवाशांना मोबाईलवरूनही रेल्वेचा पास काढता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असून तिकीट खिडक्यांसमोरील रांगा देखील कमी होणार आहे. 

रेल्वेचा पास काढण्यासाठी तिकीट खिडकीसमोर प्रवाशांची गर्दी होते. उपनगरीय रेल्वेचे तिकीट आणि पास काढण्यासाठी एकच तिकीट खिडकी असल्यामुळे प्रवाशांची आणि बुकिंग क्लार्कची अनेकदा बाचाबाचीही होते. त्यामुळे या रांगा कमी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मोबाइलवरून पास काढण्याची सुविधा प्रवाशांना पुरवण्याची योजना आखली आहे. यापूर्वी मोबाइलवरून रेल्वेचे तिकीट काढण्याची सेवा देण्यात आली होती, मात्र प्रवाशांचा त्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे मोबाइलवरून तिकीट काढण्याची सेवा रद्द करून त्याऐवजी मोबाइलवरून पास काढण्याची सेवा सुरू करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. या योजनेची कार्यवाही भारतीय रेल्वे केटरिंग अँण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) करणार आहे. रेल्वेचा माहिती-तंत्रज्ञान विभाग येत्या काही दिवसांत मुंबईत असलेल्या सर्व मोबाइल कंपन्यांशी सहकार्य करार करणार आहे. मोबाइलवर पास काढण्यासाठी मोबाईल इंटरफेस तयार करण्यात येणार आहे. मोबाइलवरून पास काढण्यासाठी प्रवाशांना डेबिट कार्ड किंवा मोबाइल बँकिंग यापैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करता येणार आहे. पास काढण्याची प्रक्रिया पूर्ण होताच प्रवाशाच्या मोबाइलवर एक एसएमएस येईल. या एसएमएसमध्ये पासाच्या कालावधीची माहिती तसेच पासची किंमत, याविषयी माहिती असणार आहे. त्यामुळे प्रवाशाला पाससाठी नेमकी किती रक्कम खर्च झाली, याची अधिकृत माहिती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रवाशाने मागणी केली तर त्याला पाससंदर्भातील माहिती ई-मेलद्वारेही पाठवण्याची तरतूद करण्यात येणार आहे.

मोबाइलवर तिकीट काढण्यासाठी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती; परंतु रेल्वेने दिलेला हा अवधी अपुरा असल्यामुळे जास्त प्रवासी या योजनेचा लाभ घेऊ शकत नसल्याचे निदर्शनास आले. दररोज सुमारे ८ लाख ३0 हजार प्रवासी आरक्षित तिकिटे बुक करतात. त्यापैकी ४५ टक्के तिकिटे आयआरसीटीसीमार्फत बुक केली जातात. म्हणजे सुमारे ४ लाख तिकिटे दररोज आयआरसीटीसीच्या मार्फत बुक केली जातात. त्यासाठी रेल्वेची जी वेबसाईट आहे, तिला अपग्रेड करणेही आवश्यक आहे. सकाळी १२ वाजण्याच्या आतमध्येच ५0 टक्के रेल्वे तिकिटांचे आरक्षण केले जाते. त्यामुळे या योजनेला यशस्वी करण्यासाठी आयआरसीटीसीच्या टिकेटिंग सिस्टिमला अपग्रेड करणे आवश्यक आहे. जेणेकरून वेबसाईट सकाळची ओपनिंग गर्दी आणि मोबाईल टिकेटिंग सिस्टिम या दोन्ही गोष्टींचा लोड घेऊ शकेल

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS