शाळेतील विषबाधेचे शिक्षण समितीत पडसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 November 2013

शाळेतील विषबाधेचे शिक्षण समितीत पडसाद

मुंबई - 27 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : साकीनाका येथील मनपा शाळेतील विषबाधा प्रकरणाचे पालिकेच्या शिक्षण समितीत मंगळवारी पडसाद उमटले. अंजुमन नुरूल इस्लाम सेकंडरी हायस्कूलचे प्राध्यापक आणि संबंधित मनपा अधिकार्‍यांना निलंबित करण्याबरोबर केकचे उत्पादन करणार्‍या बेकरी मालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी सदस्यांनी लावून धरली.

अंजुमन नुरूल इस्लाम सेकंडरी हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहार योजनेत विद्यार्थ्यांना केकचे वाटप करण्यात आले होते. या केकमधून हायस्कूलमधील ४१७ विद्यार्थ्यांना सोमवारी विषबाधा झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी तिघा जणांना अटक केली. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात चिक्की, लाडू, बिस्किटचे वाटप करण्यात येते. मात्र अंजुमन नुरूल इस्लाम शाळेत गेल्या सहा महिन्यांपासून केकचे वाटप करण्यात येत असल्याचे स्थानिक नगरसेविका लीना शुक्ला यांनी निदर्शनास आणून दिले. शालेय आहार योजनेत केकचा समावेश करण्यात आला नसला तरी सर्रास हा प्रकार सुरू होता. पालिका अधिकार्‍यांचा लक्षात हा प्रकार का आला नाही असा सवाल मनसेचे सदस्य ईश्‍वर तायडे यांनी केला. शिक्षण आहार योजनेतील आहाराचा दर्जा तपासण्यासाठी पालिकेत सहा निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या आहाराचा दर्जा स्वत: मुख्याध्यापकांनी तपासून पाहावा, अशी तरतूद असल्याचे शिक्षणाधिकारी रवींद्र भिसे यांनी सांगितले. भिसे यांच्या उत्तरावर समाधान न झाल्यामुळे सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अंजुमन नुरूल इस्लाम हायस्कूलमध्ये सहा महिन्यांपासून केकचे वाटप सुरू असताना निरीक्षक काय करत होते? असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात निरीक्षक गणेश नाईक आणि हेडक्लार्क वाघचौरे यांच्यावर कारवाई करावी आणि याबाबतचा अहवाल सादर करावा, अशी सूचना शिक्षण समिती सदस्य मनोज कोटक यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS