मुंबई - 28 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबईची न थांबता अविरतपणे सेवा करणारी पश्चिम रेल्वे दीडशे वर्षांची झाली आहे. कितीही पाऊस पडला तरीही पश्चिम रेल्वे मात्र धिम्या गतीने का होईना सुरू असते, अशी पश्चिम रेल्वेची ख्याती आहे. २८ नोव्हेंबर १८६४ साली पश्चिम रेल्वेवर पहिली लोकल सुरू करण्यात आली. मुंबई, गुजरात आणि त्यानंतर उत्तर विभागाला जोडणार्या रेल्वेचा प्रवासही तितकाच रोमांचकारी आहे.या प्रवासात मोटारमनवरील हल्ल्यापासून ते सामाजिक तसेच आर्थिक घडामोडींमध्ये पश्चिम रेल्वेचा मोठा हात आहे. सुरुवातीला मच्छीमारांचे बेट म्हणून ओळखल्या जाणार्या या भागाचे नाव नंतर बॉम्बे आणि त्यानंतर आर्थिक राजधानी मुंबई अशी ख्याती मिळवलेल्या मुंबईसाठी पश्चिम रेल्वे म्हणजे सर्वसामान्य नोकरदारांपासून ते मध्यमवर्गीयांपर्यंत त्यांच्या जीवनाचा एक कधीही न तुटणारा असा भाग झाली आहे. सुरुवातीला ग्रँट रोड स्टेशन हे प.रे.चे पहिले टर्मिनस होते. त्यानंतर सन १८७३मध्ये कुलाबापर्यंत प.रे. वाढवण्यात आली. त्यानंतर सन १९३0मध्ये कुलाबा टर्मिनस बंद करून चर्चगेट हे प.रे.चे मुख्य टर्मिनस झाले, ते आजपर्यंत दिमाखात उभे आहे. त्यानंतर प.रे.चे विस्तारीकरण होऊन सन १८५५ साली अंकलेश्वर ते गुजरातमधील उतरण असा ४७ कि.मी. अंतराचा रेल्वे मार्ग अस्तित्वात आला आणि त्यानंतर १६ एप्रिल १८५१ रोजी मुंबई ते ठाणे अशी पहिली लोकल अस्तित्वात आल्यानंतर मध्य रेल्वेने पुढे रेल्वे मार्गांचा मोठा विस्तार केला. आजच्या घडीला पश्चिम रेल्वे १ हजार ३0५ सेवांसह जवळपास ३.५0 दशलक्ष किमी अंतर रोज कापून भारतीयांची अविरतपणे सेवा करत आहे.


No comments:
Post a Comment