| मुंबई - 28 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com १ ऑगस्ट २0१२ रोजी झालेल्या करारानुसार ३ वष्रे सेवा पूर्ण के लेल्या सर्व कॅज्युअल कामगारांना बेस्ट उपक्रमाच्या सेवेत हंगामी, नवघणी पदावर सामावून घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी बेस उपक्रमातील कॅज्युअल कामगारांनी बुधवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. ३ वष्रे व तीन वर्षांपेक्षा जास्त काळ बेस्ट उपक्रमाची सेवा केलेल्या कॅज्युअल कामगारांना हंगामी, नवघवी पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार टप्प्याटप्प्याने सामावून घ्यावे, यासाठी बॉम्बे इलेक्ट्रीक वर्कर्स युनियन व बेस्ट प्रशासनामध्ये ८ जून २00६ रोजी समझोता करार झाला, मात्र या कराराची अंमलबजावणी करण्यास बेस्ट प्रशासनाने उदासीन धोरण अवलंबले असून, त्यामुळे कॅज्युअल कर्मचार्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ३ वष्रे सेवाकाळ पूर्ण झालेल्या तारखेपासून हंगामी, नवघणी पदाचे वेतन, भत्ते व सोयी सवलती प्रदान करण्यात याव्यात, रिक्त असलेल्या कायम नवघणी श्रेणी पी-१/टी १ ला पदावर सेवाज्येष्ठतेनुसार कॅज्युअल कामगारांना कायम करण्यात यावे, बेस्ट प्रशासनाला आवश्यक असेल त्या पद्धतीने कॅज्युअल कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार प्रत्येक महिन्याच्या २ व १५ तारखेला कामावर घेण्याची प्रक्रिया पूर्ववत सुरू करावी, या मागण्यांसाठी युनियनतर्फे बुधवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. |
Post Top Ad
28 November 2013
Home
Unlabelled
बेस्टच्या कॅज्युअल कामगारांचे धरणे आंदोलन
बेस्टच्या कॅज्युअल कामगारांचे धरणे आंदोलन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment