डॉकयार्ड रोड दुर्घटनेतील वारसांनी दाद मागावी कुणाकडे ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2013

डॉकयार्ड रोड दुर्घटनेतील वारसांनी दाद मागावी कुणाकडे ?

दोन महिने झाले झाले तरी आर्थिक मदत, नोकरी नाही 
मुंबई - 28 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
डॉकयार्ड रोड येथील पालिकेची इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला दोन महिने झाले. त्यात बचावलेल्या; परंतु आपले सर्वस्व गमावलेल्या दुर्घटनाग्रस्तांना राज्य शासनाने १ लाखाची आर्थिक मदत जाहीर करूनही अद्यापि त्यांना ती देण्यात न आल्याने तसेच पालिकेच्या मृत कर्मचार्‍यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याचे आश्‍वासन देऊनही पालिकेने त्याची अद्यापि अंमलबजावणी न केल्याने हवालदिल झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना आता दाद मागावी तरी कुणाकडे, असा प्रश्न पडला आहे. 

डॉकयार्ड दुर्घटनेत ६१ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर २३ कुटुंबे बेघर झाली. या भीषण दुर्घटनेत पवार कुटुंबातील ७ जणांचा बळी गेला, मात्र याच कुटुंबातील तुषार पवार हा मात्र काही कामानिमित्त घराबाहेर पडल्याने तो यातून बचावला. पालिकेच्या सेवेत त्याला सामावून घेण्याचे आश्‍वासन दिले, मात्र दोन महिने झाले तरी पालिके ने याबाबत त्याची अंमलबजावणी न केल्याने यासाठी त्याला सातत्याने पालिकेचे उंबरठे झिजवावे लागत आहे. तुषारचे भावोजी अखिलेश शिंगाडे यांनाही या अनुभवास सामोरे जावे लागले आहे. प्रसूतीसाठी मोहरी आलेली त्यांची पत्नी नमिता शिंगाडे ही या घटनेत मरण पावली. मात्र पालिकेच्या अधिकार्‍यांनी केलेल्या चुकीच्या नोंदीमुळे २ लाखांची त्यांना पालिकेने जाहीर केलेली मदत अद्यापि मिळालेली नाही. त्यांच्याकडे यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली, मात्र कागदपत्रांसह मौल्यवान वस्तू मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेल्याने तसेच या वस्तू शोधूनही सापडत नसल्याने ते हताश झाले आहे. अशीच स्थिती यातून बचावलेल्या काही दुर्घटनाग्रस्तांची आहे. अशोक सोलंकी यांच्या पत्नी व मुलीचा या घटनेत मृत्यू झाला. अनेक दुर्घटनाग्रस्त रोज या ठिकाणी जमा होतात आणि आपली महत्त्वाची कागदपत्रे, किमती वस्तूंचा शोध घेतात, मात्र हाती काहीच लागत नसल्याने त्यांना निराश मनाने माघारी फिरावे लागत आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS