| आठवले यांनी शुक्रवारी रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांसमवेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली. त्या वेळी गृहखात्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यासंदर्भात माहिती देताना रामदास आठवले म्हणाले की, अनुसूचित जातीच्या कोणा व्यक्तीने अँट्रोसिटीच्या खोट्या केसेस केल्या तर आम्ही त्याचे मुळीच सर्मथन करीत नाही. मात्र अँट्रोसिटीचे गुन्हे नोंदवणे तसेच ती प्रकरणे शेवटपर्यंत नेणे, त्या गुन्हेगारांना शिक्षा होणे यासाठी विशेष प्रयत्न सरकारने व पोलीस विभागाने करण्याची गरज आहे. फक्त मुंबई तसेच नागपूर येथे अँट्रोसिटीसाठी स्वतंत्र न्यायालये आहेत. तशीच आणखी चार-सहा महत्त्वाच्या ठिकाणी स्थापन होणे गरजेचे आहे. अन्य राज्यांत अँट्रोसिटीच्या गुन्हेगारांना लवकर जामीन मिळत नाही. महाराष्ट्रात मात्र तातडीने जामीन मिळतो. तसे होऊ नये, अशीही मागणी आम्ही केल्याचे आठवले यांनी सांगितले. अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ९0 टक्के प्रकरणांत गुन्हेगार निर्दोष सुटतात, याबद्दल आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. आठवले यांचा युतीला इशारा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने आमच्या रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या तीन आणि राज्यसभेची एक जागा जर सोडली नाही, तर मग आम्ही त्यांनाही इंगा दाखवू, असा स्पष्ट इशारा रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी दिला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, माझे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत, हे युतीच्या नेत्यांनाही माहीत आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला देण्याच्या जागांबाबत ते खबरदारी घेतीलच. मात्र तसे नाही झाले तर त्यांनाही आम्ही इंगा दाखवू शकतोच. इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या प्रश्नावर काँग्रेसने तातडीने निर्णय घ्यावा. येत्या ५ डिसेंबरपर्यंत जर इंदू मिलची संपूर्ण जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी नाही मिळाली तर मग बाबासाहेबांसाठी रक्त सांडण्यासाठीही आमची तयारी आहे, हे सरकारने लक्षात ठेवावे. तुमच्याकडे बंदुकांच्या जेवढय़ा गोळ्या नाहीत तेवढी आमच्याकडे माणसे आहेत, असेही आठवले म्हणाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत तातडीने योग्य ती सूत्रे हलवावीत. आनंद शर्मांकडून इंदू मिलची जागा स्मारकासाठी ताब्यात घ्यावी, अन्यथा आम्ही तिथे घुसू. कांबळे यांची खिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय कांबळे यांनी आज इंदू मिलच्या बाहेर आंदोलन केले. त्याची खिल्ली उडवताना ते म्हणाले की, ते तर सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत. तरीही ते मिलमध्ये घुसू शकले नाहीत. तिथे घुसण्यासठी आमचे रिपब्लिकन पक्षाचेच कार्यकर्तेच हवेत. |
Post Top Ad
23 November 2013
Home
Unlabelled
अँट्रोसिटी प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज - रामदास आठवले
अँट्रोसिटी प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज - रामदास आठवले
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment