वारसास्थळ दर्जासंदर्भातील आक्षेप ऐकून घेण्यासाठी आढावा समिती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2013

वारसास्थळ दर्जासंदर्भातील आक्षेप ऐकून घेण्यासाठी आढावा समिती

मुंबई - 26 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : वारसास्थळांच्या यादीत दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानाचा समावेश करण्याच्या वारसास्थळ संवर्धन समितीच्या निर्णयावरील आक्षेप विचारात घेण्यासाठी आढावा समितीची स्थापना केली, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. शिवाजी पार्क येथील रहिवासी अरुण चितळे आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीने दाखल केलेल्या दोन स्वतंत्र याचिकांवर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

शिवाजी पार्क मैदान वारसास्थळांच्या यादीत अंतभरूत करण्याच्या वारसास्थळ समितीच्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले आहे. याशिवाय बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने १३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकालाही याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले आहे. पालिकेने या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्या अधिकार्‍यांना वारसास्थळ समितीच्या नोटिशीवर विचार करण्याचे तसेच शिवाजी पार्क परिसरातील कोणत्याही इमारतीच्या पुनर्विकास, दुरुस्ती वा पाडकामासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यापूर्वी वारसास्थळ समितीकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळवण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पालिकेने माजी सचिव दिनेश अफझलपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा समितीची स्थापना केल्याचे न्यायालयाला कळवले. ही समिती महिन्यातून दोन वेळा वारसास्थळ दर्जासंदर्भात रहिवाशांचे आक्षेप व सूचना ऐकून घेणार आहे. याप्रकरणी न्यायालयाने पालिकेला आठवडाभरात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे तसेच राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी १७ डिसेंबरपर्यंत तहकूब ठेवली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS