| मुंबई - 26 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com मुंबई : मुंबईतील रुग्णालयांना एक विशिष्ट ओळखपत्र देण्याची महत्त्वाकांक्षी योजना इरडा अर्थात विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आखली आहे. इरडाचे अध्यक्ष टी. एस. विजयन यांनी ही माहिती मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली. अनेकदा रुग्णांची फसवणूक केली जाते. त्यांच्याकडून उगाचच भरमसाट पैसे उकळले जातात. रुग्णालयांच्या या अन्यायाला आळा घालण्याच्या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णालयांना देण्यात आलेला ओळख क्रमांक त्या परिसराचा पीनकोड क्रमांक आणि रुग्णालयाच्या नावाबरोबर जोडला जाणार आहे. या योजनेअंतर्गत विविध वैद्यकीय सेवांसाठी ही रुग्णालये किती शुल्क आकारतात याचा तुलनात्मक अभ्यास केला जाणार आहे. अशाप्रकारे अभ्यास केल्यानंतर रुग्णांकडून उपचारासाठी लागणार्या खर्चापेक्षा अधिक पैसे रुग्णालयांना आकारता येणार नाहीत. त्यामुळे राज्यात अनेक गरजू रुग्णांवर योग्य उपचार होऊ शकतील आणि कित्येक जीव वाचू शकतील. राज्यात असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना रुग्णालयाचा खर्च परवडत नाही, म्हणून ते उपचार करून घेणे टाळतात किंवा ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे ते शस्त्रक्रिया करून घेण्याच्या वाटेला जात नाहीत. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांकडून आकारल्या जाणार्या शुल्काचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे. परिणामी, रुग्णांकडून उपचारासाठी नेमके किती पैसे घेतले जातात. तसेच त्यांची फसवणूक होते का, हे उघड होईल, असे विजयन यांनी सांगितले. |
Post Top Ad
26 November 2013
Home
Unlabelled
मुंबईतील रुग्णालयांना मिळणार ओळख क्रमांक
मुंबईतील रुग्णालयांना मिळणार ओळख क्रमांक
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment