मुंबईकरांसाठी नाईट पार्किंग ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 November 2013

मुंबईकरांसाठी नाईट पार्किंग ?

मुंबई - 27 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबईत अनेक इमारतींच्या खाली पार्किंगसाठी जागाच नसते. या पार्श्‍वभूमीवर संबंधित इमारतींमधील रहिवाशांना आता मुंबईत रात्रीच्या वेळी रस्त्यांवर पार्किंगची परवानगी मुंबई महानगरपालिका देणार आहे, मात्र अशा पार्किंगसाठी पालिका मुंबईकरांकडून सर्वसाधारण पार्किंग शुल्काच्या एकतृतीयांश शुल्कही आकारणार आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर पार्किंगची सुविधा दिली तरीही नेमकी कुठे पार्किंग करायची याबाबतचा प्रश्नही मुंबईकरांना सतावणारच आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याआधी रस्ते विभागाने याबाबत नव्या योजनेचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेकडे सादर केला असून आता रात्रीच्या वेळी रस्त्यांवर पार्किंग करण्यासंबंधी मुंबई महानगरपालिका नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS