| मुंबई : 'भविष्यातील विशाल शहर म्हणून मुंबईचे नियोजन कसे असावे' या विषयावर ताज लॅण्डस हॉटेलमध्ये दोनदिवसीय परिषद (१८ ते १९ नोव्हेंबर) भरवण्यात आली आहे. राज्य शासन, मुंबई मनपा, एमएमआरडीए, मुंबई फस्र्ट, ऑल इंडिया ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट आणि युरोपातील संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल के.शंकरनारायणन, केंद्रीय नगर विकास मंत्री कमलनाथ परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मुंबई महानगर प्रदेशाचा आराखडा आणि केंद्र शासनाने जाहीर केलेल्या १२ व्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा परिषदेत विचारात घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने युरोपातील शहरांच्या विकासाबाबत अनुभव लक्षात घेता भविष्यातील मुंबईचा आरखडा तयार करण्या संबंधी परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. केंद्रीय नगर विकास राज्यमंत्री प्रियरंजनदास मुन्शी, मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया, मुंबई फस्र्ट संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नायर, डॉ. जॉवो कॅव्हीन्होक, मिकीन्सीसचे संचालक डॉ. शिरीष संख्ये, पॅरीस, अँमस्टरडॅम शहराचे महापौर, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि आर्थिक गुंतवणूकदारही परिषदेला उपस्थिती लावणार आहेत. मुंबई शहराच्या अल्पकालीन गरजा आणि भविष्यकाळातील उद्दिष्ट्ये यांना कसे तोंड देता येईल आणि मुंबई महानगराचे भविष्यातील ४0 वर्षांचा आरखडा याबाबत एमएमआरडीएचे अध्यक्ष यू.पी.एस. मदान, मुंबई पोर्ट ट्रस्टचे राजीव गुप्ता, स्टॅाकहोम शहराचे वास्तुरचनाकार जोन्स क्लेसन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन माळी परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेच्या दुसर्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव ए. के.जैन, एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त वल्सा नायर सिंह, लंडन रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक माइक ब्राऊन, हाँगकाँग शहराचे वास्तुरचनाकार जेसन हचिंग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सोनिया सेठी, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे मार्गदर्शन करणार आहेत. |
Post Top Ad
18 November 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment