सहाय्यक अभियंत्यांची थेट नियुक्ती करण्यास विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2013

सहाय्यक अभियंत्यांची थेट नियुक्ती करण्यास विरोध

मुंबई : पालिकेतील सहाय्यक अभियंतापदाची १0 टक्के पदे थेट नियुक्तीद्वारे भरण्यास तीव्र विरोध दर्शवून या नियुक्तीद्वारे भरण्यासाठीच्या ५0 लाख रुपयांच्या खर्चाच्या निधीच्या तरतुदीचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घ्यावा, अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीयरिंग युनियनने केली आहे.

पालिकेच्या अभियांत्रिक खात्यातील कनिष्ठ अभियंत्यांची १0 टक्के पदे व दुय्यम अभियंत्यांची ५0 टक्के पदे थेट नियुक्तीद्वारे प्रशासनाकडून भरली जातात आणि या अभियंत्यांतून संचालक अभियांत्रिकी व उपायुक्त अभियांत्रिकीपदापर्यंत पदोन्नती देण्याचे पालिका प्रशासनचे धोरण आहे. सहाय्यक अभियंता संवर्गामध्ये १0 टक्के पदे थेट नियुक्तीद्वारे भरल्यास १0 टक्के अभियंत्यांच्या पदोन्नतीसाठी वेगळा प्रवर्ग निर्माण करावा लागेल व त्यातून असंख्य प्रश्न निर्माण होतील. महाराष्ट्र शासनामध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी-१ व श्रेणी-२ ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात. या पदावर नियुक्त झालेल्या अभियंत्यांनादेखील कार्यकारी अभियंतापदापर्यंत पदोन्नती मिळते. सुकथकर समितीने मनपाच्या सर्व खात्यांतील सहाय्यक अभियंत्यांच्या समकक्ष असणारी अन्य खात्यातील बिगर तांत्रिक पदेही थेट नियुक्तीद्वारे भरण्याची शिफारस केली आहे. असे असताना मनपाने अन्य कोणत्याही खात्यातील १0 टक्के पदे आजमितीस थेट नियुक्तीद्वारे भरलेली नाही. त्यामुळे अभियंत्यांचे खच्चीकरण करण्यासाठी प्रशासन अभियंत्यांना सापत्न वागणूक देत असल्याचे युनियनचे यशवंत धुरी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS