| मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या मायानगरीला आणखी ४७ हजार सार्वजनिक शौचालयांची आवश्यकता असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान स्पष्ट केले आहे. मुंबईला सन २00१ मध्ये एकूण १ लाख २५ हजार सार्वजनिक शौचालयांची आवश्यकता असल्याचे मनपाने केलेल्या सर्वेक्षणाअंती समोर आले होते. मुंबईत बाहेरून मोठय़ा प्रमाणावर कामासाठी नागरिक स्थलांतर करत असून मुंबईतल झोपडपट्टय़ांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. परिणामी शौचालयांचीही आवश्यकता त्यामुळेच निर्माण झाली आहे. सकाळच्या सुमारास रेल्वे रुळांच्या बाजूला रोज दिसत असलेले चित्र नष्ट करण्यासाठी मुंबईला खर्या अर्थाने ६४ हजार सार्वजनिक शौचालयांची आवश्यकता असल्याचेही मनपाने नमद केले आहे. राज्य सरकारने मुंबईतील हे चित्र बदलावे यासाठी याआधी झोपडपट्टय़ांतील लोकसंख्या गृहित धरून दीड लाख रुपयांचा निधी शौचालय बांधणीसाठी दिला होता. हा निधी मुंबईत मोठय़ा प्रमाणावर शौचालये बांधण्यासाठी अपुरा होता. त्यामुळे ही योजनाच फ्लॉप ठरली. मुंबईत सध्याच्या घडीला ६0 टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टय़ांमध्ये राहाते हे लक्षात घेतले असता मुंबईला आणखी ६४ हजार सार्वजनिक शौचालयांची गरज असल्याचे एका स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. |
Post Top Ad
21 November 2013
Home
Unlabelled
मुंबईला आणखी ४७ हजार शौचालयांची गरज
मुंबईला आणखी ४७ हजार शौचालयांची गरज
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment