डेंग्यूचे त्वरित निदान करण्यासाठी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये खास सुविधा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2013

डेंग्यूचे त्वरित निदान करण्यासाठी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये खास सुविधा

मुंबई - 26 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबईत डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पालिकेच्या ४८ दवाखान्यांमध्ये डेंग्यूचे त्वरित निदान करण्यासाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य समिती अध्यक्षा गीता गवळी यांनी दिली.मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली असून उपनगरातील बोरिवली, मुलुंड येथील मनपाच्या रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात जावे लागते. मनपाच्या स्थानिक दवाखान्यात रक्तचाचणी सुविधा उपलब्ध झाल्यास रुग्णांवर त्वरित उपचार करणे शक्य होईल, असे काँग्रेसच्या डॉ. अजंता यादव यांनी मागील आरोग्य समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे स्पष्ट केले होते. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची सूचना आरोग्य समिती अध्यक्षा गीता गवळी यांनी प्रशासनाला केली होती. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून आता पालिकेच्या ४८ दवाखान्यांमध्ये सीबीसी तपासणी तसेच डेंग्यूचे निदान यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही कार्यकारी आरोग्य अधिकारी बामणे यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS