अंनिसचे २ डिसेंबरला आझाद मैदानात आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 November 2013

अंनिसचे २ डिसेंबरला आझाद मैदानात आंदोलन

मुंबई - 27 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : 'जादूटोणा विरोधी कायदा मंजुरी निर्धार मोहीम' राज्यभर सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर २ डिसेंबर रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार संघ येथे दिली.

डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी अद्यापि मोकाटच आहेत. जादूटोणा वटहुकूम अद्यापि मंजूर नाही. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या राजकीय इच्छाशक्तीला, महाराष्ट्राच्या सामाजिक शक्तीचे पाठबळ देण्यासाठी १४ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर यादरम्यान मोहीम हाती घेण्यात आली आहे.

चर्चासत्रे, वैश्‍विक 'अक्ट नाऊ'वेब मोहीम, सर्व समविचारी पक्ष, निर्धार परिषद संघटना, संस्था सहभागी होत आहेत, अशी माहिती मुक्ता दाभोळकर यांनी दिली. ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद््घाटन करणार आहेत. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नवृत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी असतील. नांदेड येथे ६ डिसेंबरला मोहिमेचा समारोप होत आहे. 'अँक्ट नाऊ' वेब मोहिमेमागे

आंतरराष्ट्रीय भौतिकी संशोधन संस्थेचे संचालक अतिश दाभोळकर यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS