मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि सुरक्षाचा आढावा घेण्यासाठी संसदीय स्थायी समिती मुंबईच्या दौर्यावर मंगळवारी आली होती. सीएसटी स्थानकास भेट देणार्या समितीचे अध्यक्ष टी. आर. बालू यांच्यासमोरच महिला प्रवाशांनी स्वच्छता आणि सुरक्षेच्या मुद्दय़ावर समस्यांचा पाढा वाचला.
सीएसटी स्थानकात बालू यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकार्यांसमवेत फेरफटका मारला. सुरक्षेच्या कारणास्तव बसवण्यात आलेल्या कॅमेराचा उपयोग झाला पाहिजे, तसेच त्यांचा परिणाम दिसायला हवा, असा आदेश बालू यांनी अधिकार्यांना दिला. या वेळी मरेचे महाव्यवस्थापक बी. पी. खरे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम आणि इतर अधिकारी उपस्थित होते. प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बालू हार्बर लोकलमध्ये चढले. प्रवासी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी बालू यांची भेट घेतली. बालू यांना समस्यांबाबत निवेदन सादर केले आहे.

No comments:
Post a Comment