मुंबई : मुंबईवरील २६/११ हल्ल्याच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त विविध शाळा तसेच महाविद्यालयांतील जवळपास १५ हजारहून अधिक विद्यार्थी दहशतवादविरोधी शपथ घेणार आहेत. २४ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय दहशतवादविरोधी आघाडीने 'जरा याद करो कुर्बानी' या मथळ्याखाली हा कार्यक्रम आयोजित केला आहे. दहशतवादविरोधी मोहिमेत विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अक्षयकुमार, अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी हे बॉलीवूडचे लोकप्रिय तारेही सहभागी होणार आहेत, अशी माहिती दहशतवादविरोधी आघाडीचे प्रमुख एम. एस. बिट्टा यांनी दिली. ख्यातनाम टेनिसपटू सानिया मिर्झा हीदेखील या कार्यक्रमात हजर राहण्याची शक्यता आहे. हे सेलिब्रिटी दहशतवादविरोधी लढा भक्कम करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना शपथ देणार आहेत. दहशतवादविरोधी मोहिमेत सर्वसामान्य मुंबईकरांना सामील करून घेण्यासाठी एक रॅलीही काढण्यात येणार असून २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळेंच्या पुतळ्याच्या आवारातून या रॅलीची सुरुवात होणार आहे.
Post Top Ad
20 November 2013
Home
Unlabelled
मुंबईतील १५ हजार विद्यार्थी घेणार दहशतवादविरोधी शपथ
मुंबईतील १५ हजार विद्यार्थी घेणार दहशतवादविरोधी शपथ
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment