उपनगरीय रेल्वेमध्ये आता व्हाय-फाय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 November 2013

उपनगरीय रेल्वेमध्ये आता व्हाय-फाय

मुंबई : उपनगरीय रेल्वेने प्रवास करीत असताना लोकल कधी येणार याची अचूक माहिती आता रेल्वे प्रवाशांना मिळू शकणार आहे. व्हाय-फाय तंत्रज्ञानाच्या आधारे उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांना लोकलची माहिती मिळू शकणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये याआधी हा प्रयोग यशस्वी झाला असून आता मध्य रेल्वेमध्ये व्हाय-फाय तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.

प्रवाशांना अगदी कमी किमतीमध्ये ही व्हाय-फाय सेवा पुरविण्यात येणार आहे. पिगीतर्फे ही सेवा देण्यात येणार आहे. एका मोबाईल कंपनीने उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांना व्हाय-फाय सेवा पुरविण्यासाठी मध्य रेल्वेला एक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावातून महसूल कसा मिळू शकतो, याचा अभ्यास केला जाणार आहे. विमानतळावरदेखील व्हाय-

फ ाय पुरविण्यात येते. त्याच धर्तीवर आता रेल्वे स्थानकांमध्येही व्हाय-फाय सेवा देण्यात येणार आहे. त्याद्वारे प्रवाशांना लोकलचे अचूक वेळापत्रक मिळण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वेच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, व्हाय-फाय सेवेसाठी प्रवाशांकडून किती रक्कम आकारली जाणार, हे अजून निश्‍चित नसले तरी सामान्य प्रवाशांना परवडेल, अशाच दरामध्ये ही सेवा देण्यात येणार आहे. तसेच या सेवेसाठी प्रवाशांनी कशा पद्धतीने रक्कम भरायची आहे, हे जरी निश्‍चित करण्यात आले नसले तरी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट क ार्डद्वारे प्रवासी पैसे भरू शकणार आहेत. तसेच प्रवाशांना थ्रीजीची सेवाही देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS