मुंबई : मनपाच्या रुग्णालयात बिनटाका पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. परळ येथील एफ/दक्षिण विभाग कार्यालयाच्या इमारतीमधील कुटुंब कल्याण रुग्णालय येथे शस्त्रक्रिया होणार आहे.
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया अतिशय सोपी, कमी त्रासाची, कमी वेळात होणारी असून बिनटाक्याची व वेदनारहित आहे. पुरुष नसबंदीनंतरही तोच जोम, तीच ताकद राहते व सर्व काम नेहमीप्रमाणे करू शकतो. संबंधित व्यक्तीला शस्त्रक्रियेच्या अगोदर किंवा नंतर रुग्णालयामध्ये प्रवेश घेण्याची जरुरी नसते. ही बाह्यरुग्ण उपचार पद्धती असून शस्त्रक्रियेनंतर संबंधित व्यक्ती एका तासानंतर घरी जाऊ शकतो. तसेच शस्त्रक्रियेपूर्वी किंवा नंतर उपाशीपोटी राहण्याची आवश्यकता नसते व त्या व्यक्तीला नेहमीचे जेवणही घेता येऊ शकते. शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या व्यक्तीला राज्य आणि केंद्र सरकारद्वारे अनुक्रमे ३५१ रुपये आणि केंद्र शासनाद्वारे ११00 रुपये देण्यात येतात. या शस्त्रक्रियेसाठी प्रवर्तक व पाठपुरावा करणार्या प्रवतर्कास २00 रुपये इतका लाभ देण्यात येतो. मात्र लाभार्थी स्वत:च प्रवर्तक असल्यास त्यास एकूण १६५१ रुपये इतका लाभ देण्यात येतो.
शस्त्रक्रिया होणार्या व्यक्तीचे लग्न झालेले असावे व जोडीदाराची नसबंदी शस्त्रक्रिया झालेली नसावी. लाभार्थीला कमीत कमी एक मूल एक वर्षाचे असावे. तसेच त्या मुलाचे सर्व लसीकरण झालेले असावे. शस्त्रक्रियेसाठी लाभार्थीला जोडीदाराच्या संमतीच्या सहीची आवश्यकता नाही.


No comments:
Post a Comment