मातंग समाजाचे शेकडो कार्यकर्ते जलसमाधी घेणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 November 2013

मातंग समाजाचे शेकडो कार्यकर्ते जलसमाधी घेणार

मुंबई / अजेयकुमार जाधव /  http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website )
अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, महिला आघाडी यांच्या वतीने बाबासाहेब गोपले व कुसुमताई गोपले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदान येथे १९० दिवस आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाकडे शासनाचे व सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने मातंग समाजाचे ८०० कार्यकर्ते अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घेतील असा इशारा बाबासाहेब गोपले यांनी दिला आहे. 

मातंग समाजाला ८ टक्के आरक्षण देण्याचे तत्कालीन मुख्यमत्री विलासराव देशमुख यांनी तत्वता मान्य केले होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेवून निवेदन दिले असता महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे अहवाल पाठवल्यास मातंग समाजाला न्याय देण्याचे आश्वासन राष्ट्रपतींनी दिले असल्याचे गोपले यांनी सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेवून मातंग समाजाची प्रगती होण्यासाठी अनुसूचित जाती मध्ये अ,ब,क,ड अशी वर्गवारी करून मातंग समाजाला "अ" दर्जा द्यावा अशी मागणी केल्याचेही गोपले यांनी सांगितले. 

पुणे येथील संगमवाडी येथे क्रांतिवीर लहूजी साळवे यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, तसेच मुंबई मानखुर्द येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक शासनाने युद्ध पातळीवर बांधावे अशा मागण्यासाठी आपण गेले १९० दिवस आंदोलन करूनही शासन दुर्लक्ष करत असल्याचे गोपले यांनी सांगितले आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS