मुंबईत तीन हजार मुले बालमजुरीच्या विळख्यात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 November 2013

मुंबईत तीन हजार मुले बालमजुरीच्या विळख्यात

मुंबई- बालमजुरी रोखण्यासाठी सरकारने कडक कायदे केले असले तरी आजही मोठ-मोठया शहरात अनेक मुले मजुरी करत दिसतात. ‘प्रथम’या सामाजिक संस्थेने नुकत्याच केलेल्या पाहणीत मुंबई शहर व उपनगरात सुमारे तीन हजार बालमजूर आढळून आले. तर ‘यशदा’या संस्थेने गेल्या वर्षभरात केलेल्या पाहणीत मुंबईत सुमारे ३० ते ३५ हजार मुले अत्यंत धोकादायक व्यवसायात तासन्तास राबत असल्याचे समोर आले आहे.
‘प्रथम’ने धोकादायक व्यवसायात नसलेल्या (बेघर, विक्रेते, फलाटावर राहून मिळेल ते काम करणारे) मुलांच्या विभागवार केलेल्या पाहणीत मुंबई आणि उपनगरात दोन हजार ७७ मुले आढळली. याव्यतिरिक्त जरीकाम आणि चामडयाच्या कारखान्यात काम करणारी सुमारे एक हजार मुले आहेत. दोन वर्षापूर्वी ‘प्रथम’ ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात मुंबईत सुमारे १२ हजार मुले धोकादायक व्यवसायात काम करत असल्याचे आढळून आले होते. त्या तुलनेत ही आकडेवारी कमी झाली आहे. विशेषत: मुंबईतील गोवंडी, धारावी, मदनपुरा, ठक्करबाप्पा येथील जरीकाम करणा-या मुलांचे प्रमाणही कमी होताना दिसते आहे. याचे कारण सध्या जरीकाम करण्यासाठी यंत्रे आल्याने आता मालकांना मुलांची फारशी आवश्यकता भासत नसल्याचेही पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
लोकलच्या डब्यात भीक मागणारी, डंपिंग ग्राउंडवर आपल्या पालकांसोबत कचरा वेचणारी, प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करून भंगारवाल्यांना विकण्यासाठी धडपडणारी मुले जशी शहरात आहेत, त्याही पलीकडे ज्याच्यात बालपण कोमेजून जाते अशा डोळ्याची पापणी न हलवता तासन्तास जरी कारखान्यात राबणारी, चामडयाचे कारखाने, फटाके, काच, गॅरेज, अशा धोकादायक व्यवसायात काम करणारी मुलेही मुंबईत आहेत. हॉटेलामध्ये, धाब्यावर, चहाच्या टपरीवर साहेबांना चहा घेऊन उंच-उंच टॉवर्सचे माळे चढणारी मुले आजही जाता-येताना दिसतात. घटनेच्या कलम २४ नुसार १४ वर्षापर्यंतच्या मुलांना बालमजूर म्हणून राबवणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, तरीही बालमजुरीचा विळखा कमी झालेला नाही. वर्षभरात ‘प्रथम’ने पोलिसांच्या मदतीने विविध ३१ ठिकाणी छापे टाकून १०५ मुलांची सुटका केली. तर, त्यांना राबवणा-या ११० मालकांनाही अटक करण्यात आली आहे.
मुंबईत आज बहुतेक क्षेत्रात बालमजूर आढळून येतात. विविध संघटना अशा ठिकाणी छापे टाकून मुलांची सुटका करतात. त्यांना राबवणा-या लोकांना अटकही होते. मात्र, अनेकवेळा तात्पुरत्या कारवाईमुळे मालक सुटतात आणि मजुरीचे हे चक्र असेच सुरू राहते.- किशोर भामरे, उपसंचालक, प्रथम
पाहणीत आढळून आलेली बालमजुरांची आकडेवारी (वर्ष२०११-१२)
हॉटेल२ हजार ६१३
फुडस्टॉल२ हजार २८२
चहाची टपरी१ हजार ८६७
घरकाम९५०
ढाबा३८६
अन्य३ हजार ४३१
एकूण११ हजार ५८६

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS