३0 वर्षे जुन्या इमारतींवर होर्डिंग्ज लावण्यास बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2013

३0 वर्षे जुन्या इमारतींवर होर्डिंग्ज लावण्यास बंदी

5/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : जुन्या इमारतींवर लावण्यात येणार्‍या होर्डिंग्जमुळे या इमारतींना धोका पोहोचण्याची शक्यता लक्षात घेऊन यापुढे ३0 वर्षे जुन्या इमारतींवर होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी न देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

काही महिन्यांपूर्वी माहीम येथील इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत १0 जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेस या इमारतीवर लावण्यात आलेले बेकायदा होर्डिंग जबाबदार असल्याची चर्चा या वेळी होती. या पार्श्‍वभूमीवर पालिका प्रशासनाने होर्डिंग्जबाबत नवीन नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे ३0 वर्षे जुन्या इमारतींवर होर्डिंग लावण्यास बंदी घालण्याचे प्रशासनाने ठरवले आहे, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी सांगितले. या नियमावलीनुसार धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही. तसेच दोन्ही होर्डिंग्ज मध्ये किमान १00 मीटरहून अधिक अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचेही अडतानी यांनी स्पष्ट केले.

इंदू मिल येथील बॅनर्सवर मनपा कारवाई करणार
इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीच्या पार्श्‍वभूमीवर आरपीआयच्या नेत्यांसह अन्य राजकीय पक्षांतर्फे इंदू मिल येथे ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. मात्र या बॅनर्सवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS