मुंबईत ८ महिन्यांत २२९ बलात्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2013

मुंबईत ८ महिन्यांत २२९ बलात्कार

5/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबई महिलांसाठी असुरक्षित झाल्याचे यंदाच्या वर्षभरात झालेल्या बलात्कार, विनयभंग तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून सिद्ध झाले आहे. त्यातच माहिती अधिकाराखाली एका सामाजिक कार्यकर्त्याने मिळवलेल्या माहितीनुसार मुंबईत ८ महिन्यांत तब्बल २२९ बलात्कार तर ८ सामूहिक बलात्कार झाले असून यामध्ये गुन्हेगार मुख्यत: मित्र किंवा प्रियकरच असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

सामाजिक कार्यकर्ता अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली मुंबईत घडणार्‍या बलात्काराच्या घटनांप्रकरणी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवली होती. त्यानुसार मुंबईत ८ महिन्यांत ८ सामूहिक बलात्कार झाले असून त्यात शक्ती मिलमध्ये झालेल्या दोन सामूहिक बलात्कारांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात दिंडोशी आणि बोरिवली येथे अल्पवयीन मुलींवर दोन सामूहिक बलात्कार झाल्याचे उघड झाल्यामुळे मुंबई पुरतीच हादरून गेली आहे. मागील वर्षीची परिस्थितीही जवळपास इतकीच भयंकर होती. मागील वर्षीदेखील २२३ बलात्कार आणि ८ सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. त्याचबरोबर २0११ मध्ये २११ बलात्कार आणि ९ सामूहिक बलात्काराच्या घटना तर २0१0 मध्ये १८८ लैंगिक अत्याचाराच्या आणि ७ सामूहिक बलात्काराच्या घटनांची नोंद आहे.मुंबईत पोलिसांच्या पॅट्रोलिंगचे प्रमाण घटल्यामुळे अशाप्रकारच्या घटना घडत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांी केलेला आहे. नाकाबंदीसारख्या कारवायाही सातत्याने केल्या जात नाहीत.
पोलीस म्हणतात मुंबई सुरक्षितच
मुंबईत इतक्या मोठय़ा प्रमाणावर बलात्काराच्या घटना घडत असूनही पोलीस मात्र देशभरात केवळ मुंबई शहरच सर्वात सुरक्षित असल्याचा दावा करत आहेत. तसेच ज्या घटना घडत आहेत त्या मित्र किंवा प्रियकराकडूनच घडल्या आहेत. मागील काही गुन्ह्यांची दखल घेतली असता बलात्काराच्या घटनांमधील आरोपी हे एकतर मित्र तरी असतात किंवा प्रियकर तरी असतात, हे स्पष्ट झाल्याचे मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्तांचे प्रवक्त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शक्ती मिलसारख्या घटनांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे; ज्यामध्ये आरोपींचा तसेच बलात्काराला बळी पडलेल्यांचा कुठलाही संबंध नसतो, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान,मुंबईतील बलात्काराच्या घटनांचे प्रमाण घटवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या परिने अतिशय परिश्रम घेत असल्याचे मुंबई पोलिसांनी नमूद केले आहे

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS