मुंबई - 10/12/2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : कांदिवली-चारकोप येथे तिवरांची कत्तल करून उभारण्यात आलेल्या एका बुद्धविहारासह येथील २00 झोपड्यांवर सोमवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.
खारफुटीपासून (तिवर) ५0 मीटरच्या हद्दीत कोणतेही बांधकाम करण्यास बंदी आहे. असे असताना आर दक्षिण विभागातील चारकोपमध्ये तिवरांची बेसुमार कत्तल करून तेथे झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. या ठिकाणी एक बुद्धविहारही त्यांनी बांधले होते, मात्र पालिकेने झोपड्यांसोबतच या बुद्धविहारावरही कारवाई केली. कारवाई करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गेल्या आठवड्यात या भागातील लोकांची बैठकही घेण्यात आली होती. सोमवारी वनखाते, तहसीलदार तसेच पालिका यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात आलेल्या या कारवाईत येथील झोपड्या व बुद्धविहार हटवण्यात आले. ५ जेसीबी, ५ डंपर तसेच ५0 कर्मचार्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. या वेळी घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या वेळी तेथील बुद्धविहारावर कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकाला येथील लोकांनी अटकाव केला. त्यामुळे तेथे काही काळ तणावाचे वातावरण पसरले, मात्र अधिकार्यांनी संतप्त जमावाची समजूत काढून बुद्धविहारातील बुद्धांची मूर्ती ताब्यात घेऊन विहारावर कारवाई केली. याप्रसंगी पालिका उपायुक्त (परिमंडळ-७) भारत मराठे, आर दक्षिणचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोरे, डीसीपी पाटील आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment