मुंबई - 10/12/2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : कस्तुरबा रुग्णालयात डेंग्यूच्या निदानासाठी करण्यात येणार्या चाचणीसाठी खाजगी रुग्णालयातील रुग्णांना आता १ हजार ६00 रुपयांऐवजी २ हजार ५00 रुपये मोजावे लागणार आहेत. यासंदर्भात शुल्कवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला असून आगामी स्थायी समितीच्या बैठकीत याला मंजुरी मिळवण्याची शक्यता आहे.
मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांत लक्षणीय वाढ झाली असून मनपाच्या कस्तुरबा रुग्णालयात विविध रोगांच्या चाचणीसाठी मॉल्युक्युलर डायग्नोस्टीक रेफरन्स लॅबोरेटरीची स्थापन करण्यात आली. या रुग्णालयात लेप्टो, डेंग्यू आदी रोगांबाबत चाचण्या करून निदान करण्यात येते. पालिका रुग्णालयात उपचारार्थ येणार्या रुग्णांची डेंग्यू आणि लेप्टो चाचणी मोफत केली जाते. या दोन्ही चाचण्यांसाठी १ हजार ६00 रुपये शुल्क आकारले जाते. डेंग्यू चाचणीसाठी लागणार्या कीटसोबत लागणारी उपसाधने यांच्या किमतीत गेल्या पाच वर्षांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता डेंग्यूच्या चाचणी शुल्कात वाढ करणे अपरिहार्य असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यानुसार खाजगी रुग्णालयातील रुग्णांकडून डेंग्यूच्या चाचणीसाठी १६00 रुपयांऐवजी २५00 रुपये घेण्यात येणार आहेत.

No comments:
Post a Comment