25/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की आता तुमचा पाल्य घरीदेखील अभ्यास करू शकतो. परंतु या तंत्रज्ञानामुळे संवादच कमी होऊ लागला तर.. ही बाबच सहन होऊ शकत नाही. प्रत्येक पाल्य रोबोटच बनून राहील आणि प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानालाच करायला सांगेल. त्यामुळे तणावाचे वातावरण वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोद्दार एज्युकेशन नेटवर्क यांनी केलेल्या सर्वेक्षणाअंती ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
आठवड्याला तब्बल ७0 ते ८0 तास मोबाईल फोनवर खर्च करत असून २0 ते ४0 तास पाल्यांसाठी देत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या माता घरी असतात त्यादेखील ५0 टक्के वेळ आपल्या पाल्याला देत असल्या तरीही उरलेला ५0 टक्के वेळ हा मोबाईल फोनवर खर्च करत आहेत. अशाप्रकारे सध्या मोबाईल टेक्नॉलॉजी मस्ट झाली असून मोबाईल कंपन्यांची सेवादेखील अतिशय फॉर्मात आहे. पोद्दार एज्युकेशन नेटवर्कने या सर्वेक्षणासाठी ५ हजार ६00 पालक आणि १ हजार ९00 विद्यार्थी यांची मुलाखत घेतली. त्यानंतर पालक जास्तीत जास्त तास मोबाईलवर बोलण्यात खर्च करत असल्याचे निदर्शनास आले. या सर्वेक्षणानंतर पोद्दार एज्युकेशन नेटवर्कने या पालकांना मोबाईल फोनवर अधिक वेळ खर्च करू नका, असा सल्ला दिला.मोबाईल फोनवरून निघणार्या रेडिएशनमुळे त्यांना तसेच त्यांना त्रास होऊ शकतो किंवा गंभीर आजार संभवतो, असा इशाराही दिला. या सर्वेक्षणामुळे प्रत्यक्षात समोर आलेली ही गंभीर बाब पोद्दार एज्युकेशन नेटवर्कने प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही उचलली. दरम्यान, आता तरी पालक मोबाईल फोन खाली ठेवून आपल्या पाल्यांशी जास्तीत जास्त संवाद करतील, अशी आशाही पोद्दार एज्युकेशन नेटवर्कने व्यक्त केली आहे.


No comments:
Post a Comment